गोरेगाव: हिरापुर येथे जिल्हा परिषद बांधकाम सभापतीच्या कार्यक्षेत्रातच लोकसहभाग व पत्रकार संघटनेच्या वतीने रस्त्याची डागडुजी...
तालुक्यातील हिरापुर ते पिडंकेपार रस्त्याची दयनीय अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. विशेष म्हणजे हा भाग गोंदिया जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत यांच्या कार्यक्षेत्रातील आहे. मात्र त्यांचेही कायम दुर्लक्ष होत असल्याने अखेर पत्रकार संघटना आणि हिरापूर ग्रामवासियांच्या लोकसहभागातून या रस्त्याची डागबोजी आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी करण्यात आली.