भंडारा: भंडारा पोलिसांकडून चोरीचा मुद्देमाल परत ; जनजागृती कार्यक्रमातून नागरिकांना दिला सजगतेचा संदेश
भंडारा जिल्हा पोलिसांच्या सायबर विभागाच्या कार्यकुशल पथकाने विविध चोरीच्या प्रकरणांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल मालकांना परत करून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. सायबर विभागाकडून परत करण्यात आलेल्या या मुद्देमालामध्ये 112 मोबाईल फोन, दीड लाख रुपये रोख रक्कम, तीस लाखांहून अधिक किमतीचे दागिने तसेच सहा लाख रुपये किमतीच्या 17 मोटारसायकलींचा समावेश आहे. सर्व वस्तूंची पडताळणी करून संबंधित मालकांना हा मौल्यवान माल परत करण्यात आला.