येगाव येथे नवनिर्मित ग्रामपंचायत भवनाचे माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या जयश्री देशमुख, पंचायत समिती सदस्या भाग्यश्री सयाम व होमराज पुस्तोळे उपस्थित होते. याशिवाय सरपंच आनंदराव सोनवाणे, उपसरपंच अनुताई शिवणकर आदी मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.