आर्णी: अंतरगाव येथे वयोवृद्ध शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या
Arni, Yavatmal | Nov 9, 2025 आर्णी तालुक्यातील अंतरगाव येथे एका 75 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. गुलाबराव किसनराव मार्कंड (वय 75, रा. अंतरगाव, ता. आर्णी) असे या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. दिनांक 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना तात्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्य