वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे भरलेल्या सुप्रसिद्ध बैल बाजारात यंदा उच्चांक भावाची नोंद झाली. शेतकरी रामनाथ बाजारे पाटील यांच्या चार वर्षे वयाच्या एकवर्णी ‘सर्जा-राजा’ या जोडीच्या बैलांचा तब्बल ५ लाख ११ हजार रुपयांना झालेला व्यवहार सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.