हिंगणा: सिद्धिविनायक शाळा गोमगाव येथे चार चाकी च्या धडकेत दोघांचा मृत्यू एक जखमी
Hingna, Nagpur | Dec 2, 2025 रामेश्वर हेमराज लोणगाडगे,हे त्यांचे मित्र पुनीत परमानंद रामटेके वय ३७ वर्ष व सुरज रमेश राउत असे तिघे मोटरसायकल क. एमएच ४९ बी.जी. १८२० ने बुटीबोरी एमआयडीसी येथे कामावर जात असता, पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत सिध्दीविनायक शाळा गुमगाव येथील स्पीड ब्रेकर जवळ एका अज्ञात चार चाकी वाहनाचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून यांना धडक दिली त्यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी आहे जखमी वर उपचार सुरू आहे.