कुरखेडा: गोठणगांव नाक्याजवळ एकाच ठिकाणी दोन जड वाहन फसल्याने ट्राफीक जाम, विद्यार्थी रूग्न व नागरीक अटकले
कूरखेडा -कोरची मार्गावर गोठणगांव नजीक असलेल्या गोठणगांव नाका ते जांभूळखेडा दरम्यान सूरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग रखडलेल्या बांधकाम स्थळी दोन जड वाहन एकाच ठिकाणी आज दि.२६ सप्टेबंर शूक्रवार रोजी सकाळी १० वाजता फसल्याने इतर वाहनाना मार्गक्रमण करण्याकरीता जागाच नसल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल ४ तास ठप्प होती ट्राफीक जाम मूळे जांभूळखेडा ते मालदूगी पर्यंत वाहनाची रांगच रांग लागली होती अजूनही या ठिकाणी वाहतूक कोंडी कायम असूनही एक एक वाहन चिखलातून बाहेर काढत मार्गस्थ करण्यात येत आहे.