हनी ट्रॅपद्वारे ब्लॅकमेल करून १ लाख रुपये रोख रक्कम घेऊन आणखी १५ लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ ते ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडली.याप्रकरणी अभिजीत अरुण कापसे (वय-३०,रा.ज्योतिबाची वाडी,ता.बार्शी) याने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.