पुणे शहर: पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणात मोठी अपडेट, धर्मादाय आयुक्तांनी दिला स्थगितीचा आदेश
Pune City, Pune | Oct 21, 2025 पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी विक्री व्यवहारावर स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. मुंबई येथे या प्रकरणाची तातडीची सुनावणी धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांच्या समोर पार पडली. त्यांनी या प्रकरणावर ‘स्टेटसको’ म्हणजेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे जैन समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.