कन्नड: मुसळधार पावसाने अख्खं गटच गेलं वाहुन,भरपाईने शेत परत मिळणार आहे का? – माजी आमदारांचा विद्यमान आमदारांना सवाल
कन्नड तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.सायगव्हाणसह काही भागांत शेतकऱ्यांचे अख्खे गट वाहून गेले.“भरपाई मिळेल, पण शेत परत मिळणार आहे का?” असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि १७ स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता केला.त्यांनी आमदार संजना जाधव यांना केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष काम करण्याचा सल्ला दिला.शेतकऱ्यांना मदत तातडीने मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे दरम्यान हर्षवर्धन जाधवांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.