वर्धा: दिव्यांग मानधन वाढ अमलात येत नाही; शासनाच्या उदासीनतेवर प्रहार अपंग क्रांतीचा संताप, आ. राजेश बकाने यांना निवेदन
Wardha, Wardha | Nov 26, 2025 बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने सरकारने ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ करून एकूण २,५०० रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन महिने उलटूनही या वाढीचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचलेला नाही. काहींनाच वाढीव मानधन मिळत असून दिव्यांग बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २६ नोव्हेंबर बुधवारी दुपारी १ वाजता प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देवळी येथे आमदार राजेश बकाने यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला.