जालना: जालना शहरातील प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
Jalna, Jalna | Nov 3, 2025 जालना शहरात वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत असून अनेकांना विविध आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहे. या प्रदुषणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे जालना शहरातील प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सोमवार दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठकीत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जालना शहरातील प्रदुषण नियंत्रणासाठी बैठक घेतली.