रत्नागिरी: नागपूर-मडगाव एक्सप्रेसमधून संभाजीनगरमधील प्रवाशांचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबवले
नागपूर-मडगाव एक्सप्रेसमधून थीविम ते रत्नागिरी प्रवास करीत असताना संभाजीनगर येथील दिलीप बाबुराव काटकर व त्यांचा मित्र यांचे दोन मोबाईल आज्ञात चोरट्याने लांबवले आहेत. ११ ते १२ एप्रिल दरम्यान रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला आहे. या मोबाईलची किंमत २७ हजार ९७० रुपये इतकी आहे.