पैठण: ट्रकच्या चाकाखाली चिरडून महिला ठार ,धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवळाई चौक येथील घटना
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पणे जाणाऱ्या दहा चाकी ट्रक च्या धडकेत दुचाकीवरील महिला खाली पडून ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागेवर ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास देवळाई चौक रोडवर घडली दरम्यान प्रीती शिवाजी भोंगाणे वय 30 राहणार एकोड पाचोड असे मृत महिलेचे नाव असून याच दुचाकी वरील बाप लेक हे जखमी झाले आहे दरम्यान अपघात घडल्यानंतर धुळे सोलापूर राष्ट्रीय मार्गावर काही काळ वाहतूक टप्पू झाली