गोंदिया: ग्राम चिचोली येथील मारहाणीत वृद्ध झाला जखमी, शहर पोलिसांनी घेतली घटनेची नोंद
Gondiya, Gondia | Nov 30, 2025 अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम चिचोली येथील जनार्दन मकखोवे वय 70 वर्षे यांना मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी केशोरी येथील आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक 29 नोव्हेंबर रोजी शनिवारला दाखल करण्यात आले. त्यांच्या वर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. तपास सुरू आहे.