गोंदिया: भाजपा गोंदिया जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात बैठकीचे आयोजन
भाजपा गोंदिया जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती, समन्वय,संघटन बळकटीकरण व निवडणूक व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी गोंदिया भाजपा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.गोंदिया जिल्हा निवडणूक प्रभारी गिरीश व्यास,निवडणूक प्रमुख आमदार संजय पुराम,आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी आमदार हेमंत पटले, नेतराम कटरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले उपस्थित होते