वैजापूर: तिसऱ्या दिवशी नगर परिषद निवडणुकीसाठी २ उमेदवारी अर्ज दाखल
वैजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवार तारीख 12 रोजी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.यामध्ये शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 2 साठी संदीप नामदेव बोर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक 5 साठी शिवसेनेकडून पूजा कमलेश आंबेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. तीन दिवसांत एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले असून शिवसेनेकडून ही तिन्ही अर्ज दाखल करण्यात आले आहे.