गोरेगाव: हिरडामाली पोल्ट्री फार्म जवळील पुलीयाजवळ अपघातात एकाचा मृत्यू , गोरेगाव पोलीसात गुन्हा दाखल
दि. 24 नोव्हेंबरला 3:30 वाजेच्या दरम्यान हिरडामाली पोल्ट्री फार्म जवळील पुलियाजवळ फिर्यादी पियुष रंगारी व मृतक हे लघवी करून आपल्या मोटरसायकलने स्वगावी जाण्याकरिता गाडीवर बसत असता चारचाकी वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन लापरवाहीने हयगयीने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या मोटरसायकल व वडिलांना धडक दिल्याने फिर्यादीचे वडील जखमी होऊन मरण पावल्याने व त्यांच्या मरणास कारणीभूत झाल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस स्टेशन येथे 27 नोव्हेंबर रोजी 5 वा.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.