जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री पोलिसांच्या वतीने सावंगी व गणोरी परिसरामध्ये रूटमार्चचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक संजय सहाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणे सहभाग होता.