जालना: जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम नागरिकांना वेळ देत नसल्याने नागरिकांची हेडसाड
Jalna, Jalna | Oct 8, 2025 आज दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेत नव्याने आलेले अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम नागरिकांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याने नागरिकांची हेडसाड होत असल्याचा प्रकार महानगरपालिकेत घडत आहे आज जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे मुंबई येथे गेले असताना नागरिकांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असतांना बाहेर थांबा दहा मिनिट थांबा असे सांगून भेट घेत नाही यामुळे नागरिकांनी संताप्त व्यक्त केला