धुळे: 100 फुटी रोडवरील मॉलमधील बिस्किटात आळ्या, ग्राहकाची जिल्हाधिकारी व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार
Dhule, Dhule | Sep 17, 2025 धुळे शहरातील 100 फुटी रोडवरील एका मॉलमधून खरेदी केलेल्या सीलबंद बिस्किट पॅकेटमध्ये आळ्या व बुरशी आढळल्याचा गंभीर आरोप ग्राहक अनिकेत बारी यांनी केला असून, त्यांनी जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. मुलांसाठी घेतलेले बिस्किट उघडताच हा प्रकार उघडकीस आला. तक्रारीनंतर प्रशासनाकडून चौकशी होणार असून, पालकांनी पॅकेटबंद पदार्थ वापरताना दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.