पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील पुरामुळे बेपत्ता झालेल्या राजू साळुंखे यांचा मृतदेह अखेर सापडला!
पाथर्डी तालुक्यातील पुरामुळे बेपत्ता झालेल्या राजू साळुंखे यांचा मृतदेह अखेर सापडला.तालुक्यातील पुराच्या पाण्यात तीन दिवसांपूर्वी वाहून गेलेले राजू साळुंखे यांचा मृतदेह आज अखेर माणिकदौंड तलावात आढळून आला.स्थानिकांनी मृतदेह दिसताच प्रशासनाला त्वरित माहिती दिली.या घटनेत माझी सैनिक व सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले रियाज मेजर पठाण यांनी धाडस दाखवत आणखी एका व्यक्तीसह थेट तलावात उडी घेतली आणि मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून राजू साळुंखे यांच्या निधनाने कुटुं