सावनेर: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आमदार डॉ आशिष देशमुख यांची उपस्थिती
Savner, Nagpur | Oct 15, 2025 आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई येथे शेतपाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक महसूल मंत्री श्री. Chandrashekhar Bawankule यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत शेतपाणंद रस्त्यांबाबत राज्यातील विविध भागांमध्ये असलेल्या अडचणी आणि त्यांच्या निराकरणासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री श्री. भरतशेठ गोगावले, अर्थ व नियोजन राज्यमंत्री अॅड. श्री. आशिष जैस्वाल उपस्थित होते