वणी तालुक्यातील ढाकोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानभवनाला भेट दिली. ही शैक्षणिक सैर आमदार संजय देरकर यांनी घडवून आणली. यावेळी आमदारांनी विद्यार्थ्यांना विधानभवनाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.