बुलढाणा: डॉल्फिन परिसरातून सर्प मित्राने 6 फूट लांबीच्या सापाला पाण्याच्या टाकीतून केले रेस्क्यू
बुलढाणा शहरातील डॉल्फिन परिसरात असलेल्या खालिद बिन वलीद नगर भागात एका निर्माणाधिन घरातून सर्प मित्राने 6 फूट लांब सापाला आज 27 ऑक्टोबर रोजी दुपारी रेस्क्यू केले आहे. या धामण जातीच्या सापाला सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले आहे.