भोकरदन: भाजपा ज्येष्ठ नेते व मा.कें.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी लक्ष्मीपूजन साजरे करत दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा
आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2025 वार मंगळवार रोजी रात्री 9 वाजता भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी दीपावलीनिमित्त लक्ष्मीपूजन हे विधिवत साजरे केले आहे यानंतर त्यांनी सर्व देशवासीयांना शेतकऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांचे आयुष्य निरोगी सुदृढ राहो अशी प्रार्थना केली आहे .