घनसावंगी: समृद्धीचा बॉयलर पेटला; एप्रिलअखेर एक टीपरुही गाळपाविना राहणार नाही – सतीश घाटगे
उसाच्या राजकारणातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुक्त करण्यात यशस्वी ठरलेल्या समृद्धी साखर कारखान्याने १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाची पायाभरणी करून 'समृद्धी'च्या दुसऱ्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली. रविवारी गाळप हंगाम २०२५-२६ च्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात, १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ संत-महंत आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांना उसाची चिंता करू नका,