केळापूर: पांढरकवडा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल सिंह चव्हाण यांनी आज व्यक्त केला निषेध
पांढरकवडा येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मेलकेवार यांच्यावर शिवसेनेच्या गुंडांनी भ्याड हल्ला केला आणि त्यांच्या घरातील सदस्यांना धमकी दिली व गाडीची तोडफोड केली याबाबत पोलिसात तक्रार दिली असून आज दिनांक 3 डिसेंबर रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी असे भ्याड हल्ले खपून घेणार नाही असे म्हणत घटनेचा निषेध नोंदविला आहे.