कोपरगाव: तालुक्यातील रस्त्याची दुरावस्थेची आ.आशुतोष काळे व जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
कोपरगाव मतदारसंघातील झगडे फाटा - रांजणगाव देशमुख रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे तसेच सावळीविहीर - कोपरगाव रस्त्याच्या अगदी थोड्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आज 30 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकजजी आशिया यांच्यासह आ.आशुतोष काळे यांनी दोन्ही रस्त्यांची पाहणी केली व राज्य मार्ग 65 ला लवकरात लवकर निधी मिळावा व राष्ट्रीय महामार्ग 752 जीच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आ.काळे यांनी केली.