खेड: ठेकेदारी मिळवण्यासाठी कंपनी मॅनेजरवर हल्ला, खेड सेझमधील घटना; 4 जणांना अटक
Khed, Pune | Sep 22, 2025 ठेकेदारी मिळवण्यासाठी खेड सेझ हद्दीतील निमगाव येथे ह्योसाँग टी अँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर तेजपाल नंदराम सिंग यांच्यावर चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.