कन्नड: खडतर औट्रम घाट बोगद्याला अखेर हिरवा कंदील! रस्ता होणार सुरळीत - भाजप खासदार डॉ भागवत कराड
कन्नड औट्रम घाटातील बोगद्याला रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाइनमेंट अप्रूव्हल कमिटी कडून अखेर मान्यता मिळाली आहे. नॅशनल हायवे 52 अंतर्गत 15 किमी रस्त्यात 5.5 किमी बोगदा आणि 3 किमी वाया डक्ट होणार आहे. तब्बल 2435 कोटींचा हा प्रकल्प असून, यामुळे कन्नडमार्गे प्रवास अधिक सुकर होणार आहे. लवकरच डीपीआर तयार होऊन कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज दि 25 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चार वाजता दिली.