मकर संक्रांति सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात उमरेड हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर तसेच वापरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती. दरम्यान नागपूर ग्रामीण हद्दीतील नायलॉन मांजाची विक्री करणारे तसेच नायलॉन मांजा वापरून पतंग उडविणाऱ्या तब्बल 36 आरोपींना आज सूर्यास्तापर्यंत स्थानबद्ध देखील करण्यात आले होते.