नेर: सारंगपूर येथे शुल्लक कारणातून एकास मारहाण,आरोपी विरुद्ध लाडखेड पोलिसात गुन्हे दाखल
Ner, Yavatmal | Nov 8, 2025 फिर्यादी केशव अशोकराव धोपटे यांच्या तक्रारीनुसार 5 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हा गावातील यात्रेत जाणाऱ्या रोडवर बसून असताना आरोपी गौरव शेंद्रे व आणखी एक अशा दोघांनी फिर्यादीस धक्का मारला असता फिर्यादीने धक्का का मारला अशी विचारना केली तेव्हा आरोपींनी फिर्यादी सोबत वाद करून शिवीगाळ केली व हातातील कड्याने नाकावर मारून जखमी केले. याप्रकरणी सात नोव्हेंबरला अंदाजे बारा वाजताच्या सुमारास लाडखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.