समाजातील वंचित घटक, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संस्था रामटेकचे सचिव अजय मेहरकुळे तसेच प्राणी मित्र, सर्पमित्र अजय मेहरकुळे यांना विदर्भवीर पुरस्काराने सन्मानित केले. हा गौरव सोहळा रवि. दि. 4 जानेवारीला वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी नागपूर यांच्या वतीने नागपूर येथे आयोजित करण्यात आला.अजय मेहरकुळे यांनी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक जाणीव ठेवून अनेक उपक्रम राबविले. सर्पदंश झालेल्या अनेकांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत.