लाखनी: सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : भंडाराचे पालकमंत्री डॉ संजय भोयर
संपूर्ण राज्यभर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून 2 ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत राज्य शासनाच्या वतीने विशेष करून महसूल विभागाच्या पुढाकारातून राज्यामध्ये सेवा पंधरवड्याच्या आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्या सोबतच मी भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने त्यामुळे आज भंडारा जिल्ह्याच्या सेवा पंधरवड्याला भेट दिली. मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये उत्साह आहे.