खालापूर: खोपोलीतील शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या सानिया शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
भाजपा करत असलेल्या विकासकामांवर, संघटनात्मक वाढीवर आणि पक्षश्रेष्ठींवर विश्वास ठेवत आज सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास खोपोलीतील शिवसेनेच्या सामाजिक कार्यकर्त्या सानिया शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. याचसोबत प्रभाग क्रमांक ७ मधील नामदेव मोरे व सुजाता मोरे यांनी आपल्या समर्थकांसह व किशोर पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. दरम्यान सर्वांचे पक्षात स्वागत करत सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.