हिंगोली जलयुक्त शिवार'ची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.