जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. निवडणुका अधिकृतपणे जाहीर झाल्या नसल्या तरी, इच्छुक उमेदवारांनी मात्र गाठीभेटी आणि जनसंपर्काचा धडाका लावला आहे. अवसरी बुद्रुक पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव पंचायत समिती गणातून आता एका नवीन चेहऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.