भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील आणि भाजपचे जिल्हा महामंत्री सतीश धारप यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने चवदार तळे प्राधिकरण निर्माण करण्याबाबत झालेल्या भेटीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.