आर्णी: शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेचे आज रास्ता रोको आंदोलन
Arni, Yavatmal | Oct 8, 2025 शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी व प्रलंबित मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आर्णी तालुक्यातील सातारे फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मया आंदोलनाद्वारे शासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत : राज्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांची मदत मंजूर करावी. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.