ग्रामीण भद्रूटोला कारंजा येथे पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करीत २० लिटर मोहफुली दारू जप्त केली. ही कारवाई १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:१५ करण्यात आली. पोलीस हवालदार आनंद धुवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अशोक दुलीचंद उके (४९) रा. भद्रूटोला कारंजा याच्यावर कलम ६५ (ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ........