आज दिनांक 16 जानेवारी 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे,याच कारण म्हणजे आज महापालिका निवडणूक निकाल हाती आला असून राज्यात भारतीय जनता पार्टी हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे,मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक राज्यात निवडून आल्याने या कार्यकर्त्यांनी हा फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.