गोंदिया: शिवणी ते चिरचाळबांध रोड दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा इशारा
Gondiya, Gondia | Sep 18, 2025 शिवणी ते चिरचाळबांध या मार्गाची दुरावस्था गंभीर झाली असून ग्रामपंचायत शिवणीमार्फत वारंवार तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांना अर्ज देण्यात आले. तरीदेखील आजपर्यंत रस्ता दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.याशिवाय बाघ कालव्यावरील सुमारे ५० वर्षे जुना पूल धोकाद