धुळे: धुळे आग्रा रोड फेरीवाल्यांसाठी माजी आमदार फारुक शहा सक्रिय; मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट
Dhule, Dhule | Sep 16, 2025 धुळे आग्रा रोडवरील फेरीवाल्यांना सणासुदीत व्यवसायाची परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन माजी आमदार फारुक शहा यांना दिले. प्रशासनाने हटविल्याने उपासमारीच्या संकटात सापडलेल्या या पालेभाजी व हातगाडी धारकांसाठी शहा यांनी मंत्रालयात पवार व पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले. सकारात्मक प्रतिसादामुळे नवरात्री ते दिवाळीपर्यंत दिलासा मिळणार आहे.