महाबळेश्वर: सोळशी धरणाच्या सखोल अन्वेषणाचे आठ गावातील लोकांनी काम पाडले बंद
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा विभाग होऊ घातलेल्या सोळशी धरणाला बाधित होणाऱ्या, आठ गावातील नागरिकांचा विरोध होत आहे, या प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या सखोल अन्वेषणाचे काम बंद पडले आहे, महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे या ठिकाणी सोळशी धरणाचे काम प्रस्तावित आहे, या धरणाच्या सखोल अन्वेषणासाठी धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांच्याकडून, 67लाखाची ई-निविदा काढण्यात आली असून, निधी मंजूर झाला आहे, याचे काम नुकतेच सुरू झाले आहे, हे काम स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्यात आले आहे.