चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण अपघातात तिघांचा मृत्यू तर पाच जण जखमी
चंद्रपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून पाच नागरिक जखमी झाले आहे मुल तालुक्यातील जुनाचुरला गावाजवळ ट्रकने दुचाकिला धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे तर तसेच माजरीमध्ये तेलंगणाच्या राज्यातून नातेवाईकांकडे आलेल्या नागरिकांना चार चाकी वाहनाने धडक दिल्याने एकाच्या जागीच मृत्यू तर चार जण जखमी झाले आहे