चिखली: चिखली येथील पूरग्रस्त यांच्यावतीसाठी शिवसेना आक्रमक शहराध्यक्ष विलास घोलप यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन
18 ऑगस्ट २०२५ रोजी चिखली शहरावर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ख्वाजा नगर व सैलानी नगर भागातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांतील साहित्य, वस्तू, निवासस्थान व उपजीविकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही अद्याप शासनाकडून मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, तात्काळ मदत न झाल्यास शिवसेना स्टाईलने आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.चिखली शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वात ही निवेदन देण्यात आली.