जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ.संपदा मुंडेंसाठी कँडल मार्च!
Beed, Beed | Oct 27, 2025 डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि 27 ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजता सर्व पक्ष व संघटनांच्या वतीने कँडल मार्च काढण्यात आला.यावेळी सर्व दोषींना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली.खासदाराला क्लीनचिट दिल्याबद्दल मोर्चेकऱ्यांनीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांचा सहभाग होता.