तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सेनगाव येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सतीश रुणवाल व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग फोपसे यांनी राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेत एनसीडी पोर्टल स्क्रीनिंगचे कामकाज सुधारण्यासाठी सक्त सूचना दिल्या माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत आरसीएच पोर्टल, नियमित लसीकरण, तसेच कुटुंब कल्याण शिबिर आणि क्षयरोग, कुष्ठरोग याबाबत सविस्तर आढावा घेतला प्रमोशन झालेल्या कर्मचाऱ्यांचा टिएचओ कार्यालयाकडून सत्कार करून सन्मानित करण्यात आले