आज दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी कळमेश्वर येथील उड्डाणपूल (R.O.B.) आणि गोंडखैरी फाटा रस्ता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.या वेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि राज्य मंत्री श्री. आशिष जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी आमदार श्री. कृपालजी तुमाने, माजी आमदार श्री. सुधाकरजी कोहळे, डॉ. राजीवजी पोतदार, श्री. मनोहर कुंभारे उपस्थित होते.